21व्या शतकातील कौशल्ये
21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY एकविसावे शतक हे तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचे शतक आहे आणि येथे सर्व व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या असून सहकार्याने काम करणे अपेक्षित आहे. एकविसाव्या शतकातील प्रत्येक विद्यार्थ्यास जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चिकित्सक विचार आणि सर्जनशील मानसिकता ही दोन मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत. एकविसाव्या शतकातील कौशल्यांची अशी कोणतीही स्पष्ट व्याख्या नसली तरीही, ही काही ठराविक कौशल्ये आहेत जी या तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैश्विक वातावरणात जगण्यासाठी आवश्यक आहेत. एकविसाव्या शतकातील कौशल्ये ही अशी कौशल्ये आहेत जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात जेणेकरून तो/ती आपल्या समाजाच्या/राष्ट्राच्या आणि जगाच्या प्रगती आणि विकासात योगदान देऊ शकेल. प्रत्येकास यशस्वी होण्यासाठी एकविसाव्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्ये म्हणजे अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी तसेच अनेक शिक्षणविषयक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेल्या कौशल्यांची यादी आहे. एकविसाव्या शतकात घडणार्या आणि होऊ घातलेल्या बदलांना स...